दापोली वकील संघटनेच्या निवडणुकीत ॲड. महेश सागवेकर पॅनलचा बिनविरोध विजय

banner 468x60

दापोली वकील संघटनेची कार्यकारिणी निवडणूक आज २१ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. फेब्रुवारी २०२६ ते फेब्रुवारी २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक घेण्यात आली असून, सर्व पदांसाठी एकाच पॅनलकडून अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली.

एकूण ९३ मतदार असलेल्या या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांचा बिनविरोध विजय अधिकृतरीत्या घोषित केला.

निवडणुकीत पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे—
• अध्यक्ष – ॲड. महेश मोहन सागवेकर
• उपाध्यक्ष – ॲड. ऋषिकेश नंदकिशोर भागवत
• सचिव – ॲड. सचिन शरदचंद्र गद्रे
• सहसचिव – ॲड. प्रथमेश विजय भोसले
• खजिनदार – ॲड. योगेश विष्णू दांडेकर
• महिला प्रतिनिधी – ॲड. साक्षी वैभव कदम

कार्यकारिणी सदस्य –
• ॲड. मनीषा अजित जोशी
• ॲड. रत्ना गजानन पडियार
• ॲड. प्रशांत चंद्रकांत हेदुकर
• ॲड. महेंद्र काशीराम बांद्रे
• ॲड. प्रणित बाळकृष्ण रहाटे

या निवडणुकीचे संपूर्ण कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विश्वास वसंत शिगवण, ॲड. मिलिंद अरविंद तांबे आणि ॲड. नितीन सुभाष सावंत यांनी पार पाडले.

निवडणूक निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. महेश सागवेकर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव झाला. नव्याने निवडून आलेली कार्यकारिणी दापोली वकील संघटनेच्या हितासाठी भक्कम, पारदर्शक आणि प्रभावी कार्य करेल, असा विश्वास वकील बांधवांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *