कोकण कट्टा न्यूजने १३ फेब्रुवारी रोजी “काळकाई कोंड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य, उघड्यावर प्लास्टिक कचरा, गुरांच्या जीवितास धोका—दापोली नगरपालिका देणार का लक्ष?” या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केल्यानंतर काही तासांतच संबंधित ठिकाणचा कचरा दापोली नगरपालिका यांनी हटवला आहे.

दापोली–खेड महामार्गावर करमरकर शोरूमच्या शेजारील हिल टॉप परिसरात असलेल्या भंगार डेपोच्या कडेला मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. रस्त्यालगत साचलेल्या या कचऱ्यातून परिसरातील गुरे प्लास्टिक खात असल्याचे दृश्य नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता.
संबंधित ठिकाणी दीर्घकाळापासून प्लास्टिक पिशव्या, पॅकेजिंग साहित्य व इतर अविघटनशील कचरा साचत होता. योग्य विल्हेवाट न लावता उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ झाला असून दुर्गंधीही पसरली होती. रस्त्याच्या अगदी कडेला कचऱ्याचे ढिगारे असल्याने गुरे अन्नाच्या शोधात तेथे येत होती आणि प्लास्टिक खात होती.
पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिक पोटात साचल्यास जनावरांना पचनासंबंधी गंभीर आजार होऊ शकतात आणि काही प्रकरणांत मृत्यूही ओढवू शकतो. अखेर कोकण कट्टा न्यूजच्या बातमीचा परिणाम होऊन संबंधित ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















