Breaking News
खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा

दापोली : कोकण कट्टा न्यूज इम्पॅक्ट – “माझं दापोली” गार्डन शेजारी असलेल्या तलावाला सुरक्षा जाळी बसवली

banner 468x60

दापोली येथील “माझं दापोली” गार्डन शेजारी असलेल्या तलावामुळे लहान मुलांसाठी गंभीर सुरक्षा धोका निर्माण झाला होता. या प्रकरणाची सविस्तर बातमी कोकण कट्टा न्यूजने दिली. त्यानंतर दापोली प्रशासनाने तातडीने दखल घेत आता तलावाच्या ठिकाणी लाकडी काठ्यांनी सुरक्षा झाली बसवली आहे .

banner 728x90 banner 728x90

कोकण कट्टा न्यूज चॅनेलवरून “माझं दापोली” गार्डनमधील तलावासंदर्भात बातमी प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत दापोली–दाभोळ रोडवरील प्रसिद्ध ‘माझं दापोली गार्डन’मधील तलावाभोवती सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. तलावाच्या कडेला लाकडी ओंडके व काट्यांचा वापर करून बॅरिकेड्ससारखे तात्पुरते कुंपण उभारण्यात आले आहे. कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे यांनी याबाबत सविस्तर बातमी दिली.

दापोली प्रशासनाने याची दखल घेत त्वरित उपाययोजना केली आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या गार्डनमध्ये असलेल्या छोट्या तलावाजवळ नागरिकांची सुरक्षितता

लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आल्याचे समजते. तलावाच्या अगदी जवळ कोणी सहज पोहोचू नये यासाठी लाकडी कुंपण उभारले गेले असून पर्यटकांना सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *