दापोली : उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर एक्झॉटिक ‘टर्निप’ची यशस्वी शेती

banner 468x60

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत दापोलीमध्ये प्रथमच एक्सॉटिक भाजी ‘टर्निप’ची यशस्वी शेती करून एक अभिनव पाऊल उचलले आहे. या प्रयोगाला चांगले

banner 728x90

यश मिळाले असून सध्या टर्निप विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी टर्निपसोबतच नवलखवल, झुकिनी, कोबी, फुलकोबी, मधुमका, टोमॅटो वांगी, मिरची, दुधी भोपळा, भोपळा, गवार, कलिंगड, काकडी, पडवळ, शिराळ, घोसाळ, घेवडा, भेंडी यांची शेती केली आहे. या भाज्या लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत तर यातील काही झाल्या देखील आहेत.

दापोलीकरांनी स्थानिक आणि एक्झॉटिक भाजीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे. इच्छुकांना Nursery no. 10 येथे प्रत्यक्ष शेती पाहण्याची संधी मिळणार असून खरेदीसाठीही त्याच ठिकाणी संपर्क साधता येणार आहे.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे एक्सॉटिक भाज्यांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून दापोली परिसरात भाजी उत्पादनाला नवीन दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *