हर्णे बायपास परिसरात आज दुपारी साधारणपणे १२ ते १२:३०च्या दरम्यान पुणे येथील पर्यटकांची मिनीबस पलटी होऊन गंभीर अपघात झाला. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील MH 14 GU 1616 या मिनीबसला हा अपघात झाला असून बसमध्ये पाच कुटुंबे प्रवास करत होती. अचानक झालेल्या दुर्घटनेत तब्बल १० पर्यटक जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पर्यटक जवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते.
तेथून घरी परतण्यासाठी निघताना मिनीबस रिव्हर्स घेताना चालकाचा अंदाज चुकला आणि गाडीचा तोल सुटून मिनीबस थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. पलटी होताना बसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमी प्रवाशांमध्ये
क्षितीज अशोक गुगणे-३५, आरोही पराग गायकवाड-४, पराग पर्शुराम गायकवाड-४०,
नेहा पराग गायकवाड-३५, हितेश रमेश चौधरी-४०,ओजस अक्षय कुलकर्णी-५१, सुरेश साहेबराव कुचेकर, महेश दत्तात्रय वाघमारे-३९, प्राजक्ता महेश वाघमारे-३६ सर्व
राहणार पिंपरी चिंचवड यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र आसूद येथे प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















