दापोली तालुक्यातील बोरिवली (आडीवाडी) या गावाची गेले दोन दिवस विद्युत प्रवाह बंद आहे. वायरमेन यांना गावातील ग्रामस्थांनी लागनारी मदत व सर्व सहकार्य मदत केली मात्र आता दोन दिवस पुर्ण झाले तरी लाईट अद्याप गावात नाही आहे.
त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवस लाईट नसल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाण्याच्या अडचणीचा प्रश्न निर्माण झालाक असून घरी लहान मुलं असल्याने,दोन दिवस लाईट नसल्याने खुप अडचणींना सामना करावा लागत आहेत.
दोन दिवस बोरिवली (आडिवाडी) हे गाव अंधारात आहे आज तीसरा दिवस उजाडला तरी वीज नसल्याने ग्रामस्थ हैराण झालेत. वीज नसल्याने मोबाईल नेटवर्क देखील नाही.
दर वर्षी बोरिवली (आडीवाडी) हे वर्षातुन एकदा स्वखर्चाने पुर्ण गावातील मेन लाईनवर आलेल्या झाडं थोडण्याचं काम करत असते.
पावसाळा अजुन सूरू होणे बाकीचं आहे त्याआधीच अवकाळी पावसामुळे लाईटची दोन ,तीन दिवसांची कामे होत नाहीत. त्यामुळे दापोलीतील अधिकाऱ्यांनी अश्या गावांकडे लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













