Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : कौटुंबिक वादातून महिलेवर सुरीहल्ला, विनोद भाटकर, विलास भाटकर तिघांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील जालगाव बाजारपेठ परिसरात शनिवारी सकाळी घरगुती वादाने गंभीर वळण घेत एका महिलेवर सुरीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. नम्रता भाटकर यांना त्यांच्या नात्यातील तिघांकडून मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची फिर्याद दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नम्रता भाटकर घराच्या अंगणात स्वच्छता करत असताना कचरा टाकण्यावरून त्यांची जाऊ विनिता भाटकर यांच्यासोबत वाद झाला. हा वाद अल्पावधीतच वाढत पती विनोद भाटकर यांच्यापर्यंत पोहोचला. संतापलेल्या विनोद यांनी नम्रताला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे.

banner 728x90 banner 728x90


वाद वाढत असताना नम्रताचे दीर विलास भाटकर घटनास्थळी आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास यांनी शिवीगाळ करत स्वयंपाकघरातील भाजी चिरायची सुरी वापरून नम्रताच्या उजव्या हातावर आणि मनगटावर वार केले. या हल्ल्यात नम्रता जखमी झाल्या आहेत.


नम्रतांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनोद भाटकर, विलास भाटकर आणि विनिता भाटकर (रा. जालगाव बाजारपेठ) या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींच्या भूमिकेबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *