Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली शहरातील रसिकरंजन नाट्यगृहाच्या परिसरातून एक पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, जालगाव येथील रहिवासी आणि व्यवसायिक कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र काशिनाथ चव्हाण यांनी आपली सुझुकी एक्सेस १२५ सीसी (क्रमांक MH 08 AS 8996) २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रसिकरंजन नाट्यगृहाशेजारी असलेल्या श्री समर्थ अर्थमुव्हर्स दुकानासमोरील मोकळ्या जागेत उभी केली होती. काही वेळाने ते परतले असता, त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही.

परिसरात सर्वत्र शोध घेऊनही गाडीचा पत्ता न लागल्याने, अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी ही ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची खात्री त्यांना पटली.
या घटनेनंतर चव्हाण यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


दिवसाढवळ्या नाट्यगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणावरून दुचाकी चोरीला गेल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *