Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : दारूच्या नशेत दुकानात घुसून तोडफोड; दोघांविरुद्ध गुन्हा

banner 468x60

दापोली तालुक्यातील जालगाव चोरगेवाडी येथे दारूच्या नशेतून दुकानात घुसून तोडफोड तसेच शिवीगाळ करत धमकावल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली.


या प्रकरणी केतन एम. के. (वय ३५, रा. जालगाव चोरगेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राहुल गोपीदास आणि त्याचा साथीदार जायजू (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे दोघेही दारूच्या नशेत दुकानात आले. त्यांनी कोणत्याही कारणाशिवाय शिवीगाळ करत दुकानातील साहित्याची तोडफोड केली.

banner 728x90 banner 728x90

याच दरम्यान राहुल गोपीदास यांनी तक्रारदारास फोनवर अश्लील भाषा वापरत जीवितास धोका होईल अशा धमक्या दिल्याचे नमूद आहे.


तक्रारीच्या आधारे दापोली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर ४७६/२०२५ नुसार बी.एन.एस. कलम ३२४(४), ३५१(४), ३५२.३(५) अंतर्गत नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार सपोफी/७२७ गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास सुरू असून आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान, संशयित राहुल गोपीदास हा ‘क्वालिटी बेकर्स’ या नामांकित बेकरीचा मालक असल्याचे समजते. नेमका वाद कशामुळे झाला याचा तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *