Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : दापोली पोलीस ठाण्यातच विनायक कणकेकरने आईला मारलं

banner 468x60

दापोली येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलेल्या आईला तिच्याच मुलाने पोलीस ठाण्यात शिवीगाळ करून खाली पाडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालगाव लष्करवाडी येथील सुरेखा गजानन कणकेकर (७०) आणि त्यांचा मुलगा विनायक गजानन कणकेकर (३४) हे दापोली पोलीस ठाण्यात सकाळी १०.३० वाजता चौकशीसाठी आले होते.

banner 728x90 banner 728x90

चौकशी सुरू असतानाच विनायकने जमिनीच्या वादातून आपली आई सुरेखा यांना शिवीगाळ केली आणि त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्याने लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली.

या मारहाणीत सुरेखा यांच्या डाव्या हाताचे मधले बोट मोडले असून, त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेखा कणकेकर यांनी आपल्या मुलाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *