दापोली येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आणि कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला दापोली सांस्कृतिक महोत्सव २०२६ यंदा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव दापोलीतील सर विश्वेश्वरैय्या सभागृह येथे २१ व २२ मार्च रोजी रंगला.

महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध सिनेअभिनेते देवदत्त नागे, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व महोत्सव संयोजक मिहिर महाजन यांनी या महोत्सवामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, स्थानिक कलाकार, लोककला आणि संगीत यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत नवोदितांना प्रेरणा देणे हा मुख्य हेतू आहे.
मनोगत व्यक्त करताना योगेश कदम यांनी अशा दर्जेदार सांस्कृतिक उपक्रमांमुळे दापोलीची ओळख अधिक समृद्ध होत असल्याचे सांगितले. तसेच दापोलीत लवकरच आधुनिक सुविधा असलेले नाट्यगृह उभारण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
या महोत्सवात खालूबाजा, भजन, कोकणातील पारंपरिक लोककला आणि नाट्यछटा अशा सामूहिक स्पर्धांसोबतच चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी, रिल्स आणि एकपात्री अभिनय अशा एकल स्पर्धांचाही समावेश होता. तालुक्यातील कलाकारांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
२१ मार्चच्या सायंकाळी ‘भक्तीरंग’ या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. नृत्य, गायन, वादन आणि चित्रकला यांचा सुंदर संगम रसिकांना अनुभवायला मिळाला.
२२ मार्च रोजी सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार, ढोलकीवादक निलेश परब, गायक ऋषिकेश रानडे आणि कमलेश भडकमकर यांच्या ‘सूर तेच छेडिता’ या बहारदार कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन कौशल इनामदार यांनी केले.
या दोन दिवसीय महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रतिष्ठानच्या युवा ‘प्रेरणा कट्टा’ टीमचा मोलाचा वाटा होता.
मिहिर महाजन यांनी शेवटी सांगितले की, “हा महोत्सव कोणत्याही एका संस्थेचा नसून तो संपूर्ण दापोलीतील कलाकार, रसिक आणि कलाप्रेमी दापोलीकरांचा आहे,” अशी भावना व्यक्त केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











