चिखलगाव येथे 20 एप्रिलला लोकसाधना गौरव आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन रामकृष्ण सभागृह, लोकसाधना प्रकल्प, चिखलगाव रविवार – सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत करण्यात आलं आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

डाॅ. राजा दांडेकर हे अध्यक्ष पदावरून 15 एप्रिल 2025 रोजी निवृत्त झाले. गेली 40 वर्ष निरपेक्ष वृत्तीने समाजाची सेवा करण्यासाठी 1982 साली लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली.
शिक्षण,सामाजिक विकास, शेती, महिला सबलीकरण या क्षेत्रात गेली 40 वर्ष संस्था डॉक्टरांच्या मार्गदर्शना खाली संस्था काम करत आहे. आज एका छोट्या रोपटयाचा वटवृक्ष झाला असून 350 विद्यार्थी लोकसाधनेच्या प्रांगणात शिकत आहेत.
या सगळ्या कार्याला सलाम करण्यासाठी संस्थेने डाॅ.राजा दांडेकर लोकसाधक पुरस्कार व त्यांना या कामात साथ दिलेल्या त्यांच्या पत्नी रेणू दांडेकर यांच्या नावाने रेणू दांडेकर प्रेरणा पुरस्कार देण्याचे ठरविले आहे.
हा कार्यक्रम 20 एप्रिल 2025 रोजी लोकसाधनेच्या रामकृष्ण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तरी या शुभेच्छा अणि गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी लोकसाधना परिवार आणि सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















