Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : आंजर्ले समुद्रकिनारी कासव महोत्सव

banner 468x60

दापोली तालुक्यातील आंजर्ले दा समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा महोत्सव सुरू झाला आहे. 10 एप्रिल ते 10 मे असा महिनाभर आहे. आंजर्ले किनारी भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांना हा महोत्सव पर्वणी ठरला आहे.

banner 728x90 banner 728x90

गुरुवारी दि. 10 एप्रिलपासून या महोत्सवाचा प्रारंभ झाला आहे. या दिवशी सकाळी पर्यटक आणि स्थानिक यांच्या समक्ष पाच ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.


एप्रिल व मे महिन्यात पर्यटकांची समुद्रकिनार्‍यांवर मोठी गर्दी असते. अशावेळी पर्यटकांनादेखील कासवांच्या पिल्लांच्या जन्माचा आनंद घेता येऊ लागला आहे. आंजर्लेकिनारी कासव बचाव मोहिमेअंतर्गत संवर्धन करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येण्यास प्रारंभ झाला आहे. या हंगामात या किनार्‍यावर 43 कासवांची घरटी आढळून आली असून, त्यातील 6,490 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.


कासव महोत्सवाअंतर्गत संवर्धित अंड्यांमधून बाहेर आलेली कासवाची पिल्ले समुद्रात सोडतानाचा क्षण हा पर्यटकांसाठी पर्वण ठरत आहे. गुरुवारी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली त्यावेळी सरपंच मेघना पवार, उपसरपंच प्रथमेश केळसकर, कांदळवन समिती अध्यक्ष संदेश देवकर, वनरक्षक शुभांगी गुरव, सहाय्यक उपजिविका तज्ज्ञ अभिनय केळसकर, प्रकल्प सहाय्यक क्रांती मिंडे, कासवमित्र अजिंक्य केळसकर, सूजन खेडेकर, सुयोग मयेकर व पर्यटक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *