दापोली तालुक्यातील ओळगाव विजय शंकरवाडी येथील सुधाकर गणपत मांजरेकर या 38 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
या बाबत दापोली पोलीस ठाणेत लक्ष्मण दौलत मांजरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर मांजरेकर हे 30 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास ओळगाव कातळखळा येथे केबलने जंगली झाडाच्या फांदीला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळले.
आत्महत्या करण्यामागील नक्की कारण अद्याप समजलेले नाही. दापोली पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गुजर करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















