दाभोळ : सात बायांचा आसरा , आयांचे पाणी , वाघ बारशी उत्सवात साजरी

banner 468x60

दाभोळ येथील अत्यंत पवित्र असलेले आणि रम्य असे हे मंदिर दाभोळ मधील श्री स्वयभू चंडिका मंदिर आणि देवी इंगळाई मंदिर एवढेच सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत असलेले एक पवित्र मंदिर आहे. दाभोळ मधील बाजार विहिरीच्या पुढील जाधववाडी लगत डोंगरावर साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

banner 728x90 banner 728x90

या मंदिरात जाण्यासाठी डोंगराच्या पाऊल वाटेनं जाव लागतं, सुंदर अस ठिकाण पाहून मन प्रसन्न होत. बाजूला सतत वाहणारा पाण्याचा झरा आहे. दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी किंवा तुळशी विवाह प्रारंभ या दिवशी येथे सात बायांचा उत्सव साजरा करून बाघबारशी ही प्रामुख्याने जाधववाडी आणि ग्रामस्थ साजरी करतात.


दाभोळ येथे हे वसलेले अतिशय सुबक मंदिर आहे व येथे जाधव वाडी मधील सर्व ग्रामस्थ महिलांवर्ग वाघ बारशी गुण्या गोविंदाने साजरा करतात. काही मंडळी मुंबई वरून केलेले नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवज्योत मित्र मंडळ जाधववाडी दाभोळ यांनी खूप मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *