दाभोळ : बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने 72 हजार लांबविले

banner 468x60

दापोली तालुक्यातील वणीशी तर्फे पंचनदी येथील भरणेवाडी रोडवरील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने ७२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप नारायण मयेकर (वय ६८, रा. विलेपार्ले, मुंबई) यांचे वणीशी तर्फे पंचनदी येथे ‘दुर्वांकुर निवास’ नावाचे घर आहे. मयेकर हे सेवानिवृत्त असून सध्या मुंबईत स्थायिक आहेत. २५ ऑक्टोबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ या दरम्यान त्यांचे कोकणातील घर बंद असताना ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे ग्रील उचकटून आत प्रवेश केला.

त्यानंतर घरातील कपाटाच्या चावीचा वापर करून कपाट उघडले आणि कपाटातील लॉकर हत्याराने उचकटून त्यातील रोख रक्कम चोरून नेली.

चोरीला गेलेल्या ७२ हजार रुपयांच्या रकमेमध्ये ५०० रुपयांच्या १२० नोटा, ५० रुपयांच्या १०० नोटा, १० रुपयांच्या १०० नोटा, १०० रुपयांच्या २० नोटा आणि २०० रुपयांच्या २० नोटांचा समावेश आहे. फिर्यादी मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दाभोळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दाभोळ पोलीस करत असून, बंद घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *