दाभोळ : महावितरण दाभोळ कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा, ग्रामस्थ आक्रमक

Screenshot

banner 468x60

दाभोळमध्ये वारंवार खंडित होणारा विज पुरवठा, संबंधित अधिकार्यांची कामात दिरंगाई, ठेकेदाराचा मुजोरपणा, कार्यालयातून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, नियोजित नसणारा आराखडा, कुशल लाईनमनची कमतरता, वाढीव विजबिले, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नसणारे नियंत्रण. ई. अनेक समस्यांमुळे पंचक्रोशीतील ग्रासलेल्या विज ग्राहकांनी दाभोळ शिवसेना शाखेच्या माध्यमातून दाभोळ येथील विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्चा आज काढण्यात आला आहे .

banner 728x90


ग्राहकांच्या शंकांचे निरसन कण्यासाठी दाभोळ कार्यालयात दापोली उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता अ. श. कुकडे उपस्थित होते.

Screenshot

आक्रमक विज ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियांना सामोरे जातांना उप कार्यकारी अभियंत्यांना मोठीच कसरत करावी लागली. मात्र लाईट कुठून गेली याचे समर्पक उत्तर संबंधित अधिकारी देऊ शकले नाहीत. अनेक त्रस्त ग्राहकांनी आपापल्या समस्या मांडल्या.

Screenshot

वारंवार खंडित होणारा विज पुरवठा, कमी-जास्त दाबाने होणारा पुरवठा, दोन/दोन दिवस नसणारा पुरवठा या कारणाने ग्रामस्थ, व्यापारी, कामगार वर्ग, सेवा उद्योग ईत्यादिकांचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे, अशा ग्राहकांनी उप अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. जर तुम्हाला आवश्यक बाबींची मागणी करावयास जमत नसेल तर चालू अधिवेशनात आम्ही पंचतारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.


शेवटी उप कार्यकारी अभियंता अ. श. कुकडे यांनी 2/4 दिवसांत मी युध्दपातळीवर काम करुन वारंवार विज खंडित ही समस्या सोडवून देतो असे सांगितले. त्यावर उपस्थित शिवसैनिक, ग्रामस्थांनी 8 दिवसांची मुदत दिली व जे कबुल केले आहे ते लिखित स्वरूपात द्या अशी मागणी केली. उपस्थितांचा आग्रह लक्षात घेता उप कार्य. अभियंता यांनी

लिखीत स्वरुपातील आश्वासन पत्र दाभोळ शिवसेना शाखाप्रमुख रमाकांत दाभोळकर यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी शिवसेना दाभोळ शाखाप्रमुख रमाकांत दाभोळकर, रोहन तोडणकर, नरेश साळवी, श्याम दाभोळकर, रविकांत पादड, गिरीश वानरकर, संदिप गमरे, रोहन यादव, संध्या पालकर, काव्या मोरे, विक्रांत जांभारकर, शब्बीर हुसेन त्याचबरोबर दाभोळ, ओणी, नवसे पंचक्रोशीतील अनेक महिला-पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *