रत्नागिरी : शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; शहरात खळबळ

banner 468x60

रत्नागिरी शहरातील एका ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकाविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थीनीशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकार फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचा आरोप पीडित विद्यार्थीनीने केला आहे.

banner 728x90

पीडित मुलीने रत्नागिरी जिल्हा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रार अर्जानुसार, संबंधित शिक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत अल्पवयीन विद्यार्थीनीशी प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आले. तसेच शहराबाहेर नेऊन फिरविण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.


तक्रारीनुसार, दीर्घ काळानंतर संबंधित शिक्षकाने लग्नास नकार दिला आणि पीडितेला स्वीकारण्यास नकार दिल्याने मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित मुलीने धैर्याने पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत रत्नागिरी पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ६४(१), ६४(२)(फ), ६९, ३५१ तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांकडून अशा प्रकारचे कृत्य घडणे अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी असलेल्या पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, पोलीस तपास सुरू असून आरोपी शिक्षकाला अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *