गोवळकोट रोडवरील मोहसिन अपार्टमेंटच्या पाठीमागे एका ३४ वर्षीय तरुणाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना ५ मे रोजी सायंकाळी १६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा अबुबा दराडे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश प्रकाश कदम (वय ३४, रा. मिरजोळी बौध्दवाडी, ता. चिपळूण) हा गोवळकोट रोडवरील मोहसिन अपार्टमेंटच्या पाठीमागे बसून बेकायदेशीररित्या गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करत असताना आढळून आला.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.स

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















