सावर्डे येथील वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे दि. ८, ९, १० फेब्रुवारी रोजी मूत्राशयाच्या आजारात बाबत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरासाठी मुंबईचे युरो सर्जन डॉ. सतेज सबनीस उपलब्ध राहणार आहेत.शिबिरात मूतखडे, प्रोस्टेस्ट ग्रंथी, मूत्रमार्गाचे आजारावर दुर्बिणीद्वारे उपचार करण्यात येतील.
मुतखडा रुग्णांचे प्रमाण कोकण विभागात भरपूर आहे. मुतखडे हे किडनीमध्ये, मूत्र मार्गात किंवा मुत्राशयाच्या पिशवीत होतात.
रुग्णाला अचानक पोटात दुखणे, उलट्या होणे, लघवीतून रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे मुतखडा झालेल्या रुग्णांत दिसतात.
शिबिरात मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथी या आजारास महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. ग्रामीण भागातील रुग्णांनी शिबिरात सहभागी होऊन लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*