Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

चिपळुण : घर फोडून तब्बल साडेपाच लाखांच्या दागिन्यांची चोरी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील खेर्डी-भुरणवाडी येथे बंद घर फोडून एका चोरट्याने तब्बल ५ लाख किमतीचे दोगिने लंपास केल्याची घटना सोमवारी घडली होती. या चोरीचा छडा लावताना पोलिसांनी अवघ्या दोन तासात एका १५ वर्षीय अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले आहे.

banner 728x90 banner 728x90

त्याच्याकडून चोरलेले दागिनेही हस्तगत केले आहेत. याबाबतची फिर्याद विनायक विठ्ठल खेडेकर (३४, रा. खेर्डी-भुरणवाडी) यांनी दिली आहे. खेडेकर हे सकाळी ११:३० ते रात्री ११ यावेळेत घर बंद करुन कामानिमित्त घराबाहेर गेले होते.

याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने बंद घरात प्रवेश करुन कपाटातील ५ लाख ३७ हजार किमतीचे दागिने लंपास केले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विनायक खेडेकर घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ चिपळूण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरीचा छडा लावण्याच्यादृष्टीने तपासाची चक्रे वेगवान फिरवली.

त्यानुसार गोपनीय माहिती व चहुबाजूच्या तपासाअंती चोरीमध्ये त्या परिसरातील एक १५ वर्षीय अल्पवयीन चोरटा असल्याचे स्पष्ट होताच त्याला ताब्यात घेतले. चोरट्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने हे दागिने त्याच्या घरातच लपवल्याचे सांगितले. पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हेडकॉन्स्टेबल बुषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *