Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

चिपळूण : खेर्डीत पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त

banner 468x60

खेर्डी एमआयडीसी रस्त्यावर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका संशयिताला रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी एका संशयिताला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रत्नागिरीनंतर आता चिपळूणमध्ये अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

banner 728x90 banner 728x90

चिपळूणमध्ये मागील वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी स्थानिक पोलिसांनी किरकोळ कारवाया केल्या आहेत.


रत्नागिरीत मागील काही दिवसांपासून पोलिसांची अमली पदार्थ विरोधी धडक कारवाई सुरू आहे. अमली पदार्थ विकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरीमध्ये कारवाई सुरू असतानाच आता चिपळूणमध्ये ही पोलिसांनी मोर्चा वळविला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक नितीन ढेरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह आज चिपळूणमध्ये गस्त घालत होते. चिपळूण शहरापासून जवळ असलेल्या खेर्डी एमआयडीसीतील रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची मोहीम सुरू असताना तेथे दीपक रंगला लीलारे (वय २४, कावीळतली, चिपळूण) हा तरुण आपल्या दुचाकीवरून एका कापडी पिशवीतून काहीतरी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना संशय आला.


पोलिसांनी लीलारे याला थांबवले आणि चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची पिशवी तपासल्यानंतर त्यात नऊ ग्रॅम एमडी अमली पदार्थ आढळून आला. बाजारात त्याची किंमत पाच लाख वीस हजार रुपये इतकी आहे.


पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतला. त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. हे अमली पदार्थ नेमके आले कुठून? कोणाला विकले जाणार होते आणि यामध्ये अन्य कोण कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *