चिपळूण : पोलिसांची तत्परता, घरफोडीचा अवघ्या दोन तासात छडा

banner 468x60

चिपळूण- तालुक्यातील खेर्डी-भुरणवाडी येथे बंद घर फोडून एका चोरट्याने तब्बल ५ लाख किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० ते रात्री ११ च्या दरम्यान घडली होती. रात्री ११ वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर या चोरीचा छडा लावण्यासाठी चिपळूण पोलिसांनी केलेल्या तपासाअंती अवघ्या २ तासात एका अल्पवयीन चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून पोलिसांनी चोरलेले दागिने हस्तगत केले आहेत. या बाबतची फिर्याद विनायक विठ्ठल खेडेकर (३४, खेर्डी-भुरणवाडी) यांनी दिली. खेडेकर हे सकाळी ११.३० ते रात्री ११ या वेळेत कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने बंद घराच्या दर्शनी दरवाजाचा

• कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाकडे लक्ष केंद्रीत करुन त्यातील मंगळसूत्र, ब्रेसलेट, कर्णफुले, अंगठी असे ५ लाख ३७हजार किंमतीचे दागिने लंपास केले. रात्री ११ च्या सुमारास विनायक खेडेकर घरात आल्यानंतर त्यांना हा चोरी प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ याची कल्पना चिपळूण पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या चोरीचा छडा लावण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली. त्यानुसार गोपनीय माहिती व चहूबाजूच्या तपासाअंती या चोरीमध्ये त्या परिसरातील एक अल्पवयीन चोरटा असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व अवघ्या दोन तपासातच या चोराचा छडा लावला. त्यानंतर त्या चोरट्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने हे दागिने त्याच्या घरातील एका झाडाच्या खाली लपवून ठेवले होते.

पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *