चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकांच्या आदेशानुसार लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या कारवाईत पोलीस उपनिरीक्षकाच्या सहकाऱ्याला रंगेहात पकडले, ज्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सावर्डे पोलीस स्टेशन येथे मयताच्या वारसांना विमा रक्कम मिळवण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करायचा होता. यासाठी अपघातात सहभागी वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल आणि डीओआर फॉर्म आवश्यक होता. पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांनी सुरुवातीला तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी एसीबीकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले.
पोलीस उपनिरीक्षकांनी ही रक्कम थेट न घेता, खाजगी इसम अभिजित प्रकाश शिर्के (रा. चिपळूण) यांच्यामार्फत घेण्याचे तक्रारदाराला सांगितले. त्यानुसार तक्रारदार सोमेश्वर जनरल स्टोअर्ससोमेश्वर जनरल स्टोअर्स येथे गेला. इथे अभिजित शिर्के यांनी पंचांसमक्ष १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि त्यांना ताब्यात घेतले गेले.
पडताळणी करताना हे निष्पन्न झाले की, लाच रक्कम लोकसेवकाच्या सांगण्यावरून तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारण्यात आली होती. एसीबीने संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली एसीबी रत्नागिरी पथकाने केली. पथकात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे आणि इतर सदस्य सहभागी होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













