Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

चिपळुण : मुस्लिम दांपत्याने हिंदू मुलीचे केले कन्यादान, इमरान सय्यद यांचा आदर्शाचा नवा पायंडा

banner 468x60

समाजात धार्मिक तेढ निर्माण होत असताना, चिपळूणमध्ये एका मुस्लिम दांपत्याने सामाजिक सलोख्याचे काम केले आहे.

banner 728x90 banner 728x90

शहरातील गोवळकोट येथील रहिवासी इमरान सय्यद यांनी त्यांच्या घरी कार्यरत असलेल्या हिंदू मुलीचा विवाह हिंदू रीतिरिवाजानुसार स्वतःच्या खर्चाने केला. आई-वडिलांचे छत्र हरवलेली प्रतिभा लहानपणापासूनच इमरान सय्यद यांच्या कुटुंबासोबत राहिली.

घरातील कामे करता करता ती त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य बनली. आपल्या सख्ख्या बहिणीप्रमाणे असलेल्या प्रतिभेसाठी इमरान यांनी योग्य जीवनसाथी शोधून काढला आणि त्याच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेतली. या विवाह सोहळ्याचे आयोजन नुकतेच इमरान यांच्या निवासस्थानी करण्यात आले.


या मंगल सोहळ्यात इमरान यांचे संपूर्ण कुटुंब आनंदाने सहभागी झाले होते. त्यांनी नववधू प्रतिभाला आवश्यक असलेली आभूषणे, भेटवस्तू आणि संसारोपयोगी साहित्य प्रदान केले.

एका पित्याची भूमिका निभावत इमरान सय्यद आणि त्यांच्या पत्नीने प्रतिभाचे कन्यादान केले. या विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्चही त्यांनी आनंदाने उचलला.

गोवळकोटमधील या संवेदनशील मुस्लिम दांपत्याने केलेल्या या उदात्त कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्यांनी समाजाला एकजूट आणि मानवतेचा अनमोल संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *