‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत कोकण विभागातील सर्व नगर परिषदांमध्ये चिपळूण नगरपरिषदेने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रथम क्रमांक पटकावला असून नगरपरिषदेला ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या यशामागे तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मेहनतीसह त्यांच्या कल्पक नियोजनाचे विशेष कौतुक होत आहे.
चिपळूण नगर परिषदेला ‘माझी वसुंधरा’ अभियानात सातत्याने यश मिळत असून, यावर्षीही अभियानातील सर्व आवश्यक निकष पूर्ण करत विविध पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. सायकल डे, स्वच्छता, हरित उपक्रम आदी कार्यक्रम नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे विशेष लक्षवेधी ठरले. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळेच चिपळूणने कोकण विभागात अव्वल स्थान पटकावले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी चिपळूण शहरातील सर्व नागरिक, सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचे आभार मानले आहेत. तसेच नगरपरिषदेतील उद्यान विभागासह सर्व विभागांचे प्रमुख, आजी-माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, खासदार व पालकमंत्री यांचेही सहकार्याबद्दल त्यांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे चिपळूण नगरपरिषदेची राज्यस्तरावर सकारात्मक प्रतिमा निर्माण होत असून, पुढील काळातही ही यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















