चिपळूण शहरातील बहादुरशेख नाका येथील चौकात आज मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोला दुचाकीने पाठीमागून येऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.
अपघातानंतर ग्रामस्थांनी धाव घेत रास्ता रोको केला आहे. आयशर टेम्पो खेडच्या दिशेने वेगाने जात होता. बहादुरशेख नाक्यातील चौकात आयशर टेम्पो जात असताना दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. मात्र बहादुरशेख नाका रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटसमुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे बॅरिकेटस काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातातील जखमीची ओळख अद्यापही पटलेली नाही.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*