Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

चिपळूण : अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे टेली आयसीयु सेवेचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शुभारंभ

banner 468x60

अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे सहयाद्री सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटल, कराड यांच्या सहकार्याने टेली आयसीयु सेवेचा शुभारंभ आज सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता आमदार शेखर निकम यांच्या हस्ते, आएएमए चिपळूणचे अध्यक्ष डॉ. अब्बास जबले आणि सह्याद्री हॉस्पिटल कराडचे युनिट हेड डॉ. अमित माने यांच्या उपस्थितीत होत आहे.

banner 728x90 banner 728x90


आजच्या आधुनिक वैद्यकीय युगात केवळ, आरोग्यसेवा नुसती उपलब्ध करून भागत नाही तर त्याला तत्परता, गुणवत्ता आणि स्थानिक वैदयकीय तज्ञांची पुरेपूर क्षमता याची जोड द्यावी लागते, तशी अपेक्षाही निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि डोंगरी प‌ट्ट्यांत अद्यापही गंभीर रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज आयसीयु सुविधा अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत.

परिणामी गंभीर रूग्णांवर वेळेत उपचार न मिळाल्याने होणारा धोका मोठा असतो. या पार्श्वभूमीवर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण दुर्गम प्रदेशामधील रूग्णालयात शहरातील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी टेली-आयसीयु सेवा ही काळाची गरज ठरली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील याच त्रुटींचा वेध घेत कराड, पुणे येथील नामवंत, उच्चविदया विभूषित वैद्यकीय तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आता अपरांत चिपळूणमध्ये अशी टेली-आयसीयु सेवा सेवा कार्यान्वित होत आहे. अपरांत हॉस्पिटल हे नेहमीच दूरगामी भविष्यातील आरोग्याचा वेध घेऊन कोकणवासियांची सेवा करणारे लोकाभिमुख आरोग्यसेवा आहे.

वैदयकीय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आपल्या कोकणवासियांसाठी अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करण्यासाठी अपरांत हॉस्पिटल नेहमीच प्रयत्नशील असते. टेली-आयसीयु ही डिजीटल प्रणाली असून शहरातील आयसीयु तज्ञ डॉक्टर हे दुरस्य पध्दतीने (remotely) ग्रामीण दुर्गम प्रदेशातील रूग्णालयातील आयसीयु रूग्णांचे तपशील, मॉनिटरींग, उपचार यावर सतत लक्ष ठेवतात आणि स्थानिक डॉक्टरांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

यात व्हिडिओ कॉन्फरंन्सिग, लाईव्ह पॅरामीटर्स मॉनिटरींग, डिजीटल मेडिकल रेकॉर्डसचा वापर केला जातो. याच पार्श्वभूमीवर अपरांत हॉस्पिटल भविष्यातील आधुनिक वैदयकीय तंत्रज्ञानाला अंगीकारत टेली-आयसीयु सेवा कोकणवासियांसाठी सुरू करीत आहे. या उपक्रमात त्यांना तांत्रिक व तज्ञ सेवेसाठी सहकार्य लाभले आहे, ते म्हणजे सहयाद्री सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटल, कराड या प्रगत रूग्णालयाचे. या परीसरात प्रथमच सुरू होत असलेल्या या टेली आयसीयु सेवेमुळे आता चिपळूण व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गंभीर रूग्णांवर २४ x ७ शहरातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार होऊ शकतील.

v3n टेली-आयसीयुचे पाच महत्त्वाचे फायदे ज्याचा चिपळूण भागातील रूग्णांना निश्चित फायदा होईल, ते खालीलप्रमाणेv3n तात्काळ तज्ञ सल्ला – गंभीर रूग्णांच्या प्रकृतीत अचानक घडणारे बदल लक्षात घेवून, तात्काळ निर्णय घेणे शक्य होते. प्रवासाची गरज टळते रूग्णांना शहरात हलवण्याचा विलंब आणि त्याचा धोका टळतो. खर्चातही बचत होते.

स्थानिक डॉक्टरांचे सशक्तीकरण शहरातील अनुभवी आयसीयु डॉक्टरांकडून मार्गदर्शनामुळे स्थानिक वैदयकीय टीम अधिक सक्षम अधिक कार्यप्रवण होते.. प्रमाणित उपचार पध्दती, सहयादी हॉस्पिटलमार्फत देण्यात येणारे SOPs आणि क्लिनिकल प्रोटोकॉल्समुळे उपचार दर्जेदार आणि प्रगत वैदयकशास्त्र कसोटीवर तंतोतंत उतरतात.v3n मृत्यूदरात लक्षणीय घट- वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यामुळे अत्यंत अत्यवस्थ ICU रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते.

याबद्दल बोलताना डॉ. अमित माने, युनिट हेड, सहयाद्री सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटल, कराड म्हणाले, “टेली-आयसीयु ही केवळ सेवा नाही, तर एक जबाबदारी आहे. आमचे तज्ञ आता चिपळूणमधील रूग्णांच्या उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रत्यक्ष योगदान देत आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. हा उपक्रम एक वैदयकीय क्रांती आहे आणि याचा फायदा निश्चितच सर्व कोकणवासियांना होईल असा आम्हाला विश्वास आहे.” डॉ. यतिन जाधव, संचालक, अपरांत हॉस्पिटल, चिपळूण म्हणाले, ” चिपळूण भागातील गंभीर रूग्णांना शहरातील तज्ञ सुपरस्पेशियालिटी डॉक्टरांची सेवा वेळेवर मिळावी,

ही आमची सदिच्छा टेली-आयसीयुच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. सहयाद्री हॉस्पिटलसारख्या सक्षम भागीदारामुळे ही सेवा अधिक विश्वासार्ह आणि प्रभावी ठरली आहे.” आता अत्यवस्थ जोखमीच्या रूग्णांना कराड, पुणे येथे हलविण्याची गरज नाही, तेथील अति उच्च शिक्षित डॉक्टरांचा सल्ला व सेवा चिपळूणमध्ये राहूनच उपलब्ध होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *