TWJ कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत पालम याना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घोटाळ्याची रक्कम सुमारे १,२०० कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला समीर नार्वेकर महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याची माहिती होती. मात्र, ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे गुजरातमधून या तिघांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणात यापूर्वी रत्नागिरी पोलिसांनी संचालक संकेत भाग याला अटक केली होती. त्यानंतर तपासाला वेग आला. राज्यातील आठ जिल्ह्यांतून समीर नार्वेकरविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. राजकारणी, मंत्री-आमदार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोट्यवधींचा चुना लावल्याचे आरोप आहेत.
या कारवाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तपास अधिकारी माधवी कुंभार आणि त्यांच्या टीमने आठवडाभर गुजरातमध्ये तळ ठोकून ही अटक केली. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे TWJ कंपनीच्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.
तपास अधिकारी माधवी कुंभार यांच्याजवळ कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी संपर्क केला असता ही अटक झाली असल्याची माहिती दिली असून याबाबतची सविस्तर माहिती थोड्यावेळात आपल्याला दिली जाईल असं तपास अधिकारी माधवी कुंभार यांनी सांगितलं आहे.
पती-पत्नीला अटक झाल्यामुळे तपासाला वेग आला असून, येत्या काळात आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल कोकण कट्टा न्यूजचे गुंतवणूकदारांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













