Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : मुरुडमध्ये दिवाळीत ग्रामस्थांना ‘पाण्याची दिवाळी, दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, नागरिकांमध्ये संताप

Screenshot

banner 468x60

दिवाळीतच मुरुड ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. मागील दहा दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा ठप्प असून नागरिकांना अक्षरशः ‘पाण्याची दिवाळी’ साजरी करावी लागत आहे.

प्रातिनिधिक फोटो

banner 728x90 banner 728x90

ग्रामस्थांनी सांगितले की, पाण्याच्या समस्येबाबत ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार संपर्क साधला असता “पंप बिघडला आहे”, “पाणी कमी खेचले जात आहे” अशी केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

मार्च ते ऑगस्ट या काळात ग्रामस्थ खारे पाणी पिण्याची वेळ येते, आणि आता दिवाळीच्या अगोदरच पूर्णतः पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांचे प्रचंड हाल होत होते . ग्रामपंचायतीकडे दोन पंपांची सोय नसल्यामुळे एक पंप बंद पडला की संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा खंडित होतो.

पंप दुरुस्तीस वेळ लागतोय असे सांगण्यात येत असले तरी ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. अनेकांना पिण्याचे पाणी बाहेरून विकत घ्यावे लागत आहे.

ग्रामपंचायतीच्या या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, “ग्रामपंचायत झोपली आहे” अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *