मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

banner 468x60

गुहागर : मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोदजी गांधी यांच्या सौजन्याने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोदजी गांधी यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर आणि मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप आयोजित केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत जनतेसाठी विविध उपक्रम राबवत असते, त्याचाच एक भाग म्हणून मनसे 19 वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून या लोकोपयोगी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तर्फे करण्यात आले आहे.

अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये खालील तपासण्या व औषधे मोफत देण्यात येणार आहेत. तज्ञ डॉक्टरांची तपासणी व आहाराबद्दल मार्गदर्शन* रक्तदाब* मधुमेह * औषधे* इसीजी * कर्करोग तपासणी* वजन आणि आहाराबद्दल मार्गदर्शन* मोफत डोळे तपासणी * मोफत चष्मा तसेच रक्तदान करण्यासाठी तालुक्यातील विविध समाज संघटनांचा सुद्धा सहकार्य आहे.

सदर शिबिर 9 मार्च रोजी भवानी सभागृह, पालपेणे रोड, शृंगारतळी येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आपण राहुल जाधव 8975348123 या क्रमांकावर संपर्क करू शकता गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते, की सदर शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *