संगमेश्वर : बिबट्याची दुचाकीला धडक; दोघे जखमी

banner 468x60

दुचाकी समोर अचानक बिबट्या आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वारासह अन्य एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास शास्त्रीपुल आंबेड -डिंगणी मुख्य रस्त्यावर घडली.

जंगल भाग सोडून गेले काही दिवस संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या गावांत मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची खाद्य शोदार्थ रात्रंदिवस भटकंती सुरु असून. काहींना प्रत्यक्षात बिबट्याचे दर्शन झाल्याचेही बोलले जात आहे.

तर भर मानवीवस्ती तसेच शहरीभाग व वाहन वर्दळीच्या च्या ठिकाणी बिबट्या मुक्या जाणवरांची सावज साधण्यासाठी भटकंती करत असल्याचे तसेच सौरव रसाळ यांच्या घरा जवळ येऊन भटक्या कुत्र्यांची पिल्ले पळवून नेत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले आहे.

एकंदरीत येथील वातावरणात बिबट्या ची दहशत एवढी गडद झाली आहे. कोपऱ्या-कोपऱ्यात, नाक्या- नाक्यात चर्चा ऐकायला मिळतेय ती फक्त आणि फक्त बिबट्याचिच. तसेच पहाटे मोर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्यांच्या मनात सुद्धा भीती निर्माण झाल्याने ते ही बाहेर पडत नाहीयेत.

तसेच नेहमी उशिरा पर्यंत गजबजणारे संगमेश्वर बाजारपेठ सुद्धा लवकरच सामसूम होत आहे. बिबट्याची अशी दहशत असताना आज तर चक्क शास्त्रीपुल आंबेड -डिंगणी या नेहमीच वाहनवर्दळीने गजबलेल्या मुख्य रस्त्यावरच वाघाने आंबेड खुर्द येथील मंदार मोहन राहटे (वय वर्ष 26) व त्याच्या बरोबर दुचाकी वरून प्रवास करणारी प्राजक्ता संतोष चव्हाण (

वय वर्ष 26 गाव कोळंबे) हे रेल्वे स्टेशन येथे जात असताना आंबेड मुख्य रस्त्यावरून भांडारवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी अचानक धावत आलेल्या वाघाने त्यांच्या दुचाकीला धडक देत तेथून पुन्हा जंगलच्या दिशेने पळ काढला.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *