खेड :बज्म-ए-इमदादीयांच्या शाळांमध्ये शिक्षण सप्ताह समारोप संपन्न

banner 468x60

खेड-शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.ए केजी एण्ड प्रायमरी व एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये

रविवार दि.28 जुलै 2024 रोजी सकाळी 9:15 ते दुपारी 12:30वाजता मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आयशा अमीर नेवरेकरच्या कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स.शिक्षक करबेलकर यांनी पाहुण्यांचे परिचय करून देताना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

परकार सरांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना आनंद व्यक्त केला. माननीय कायदेतज्ज्ञ परवेज महाडीक सरांनी नव्याने निर्माण झालेल्या कायद्यांची माहिती देताना आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती देताना प्रत्येक नागरिकाने कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले.

निवृत्त शिक्षक अब्दुल कादीर नाडकर सरांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. निवृत्त शिक्षक चाॅंद आगरखेड सरांनी मोबाईलचे दुष्परिणाम सांगताना यशासाठी नियोजनाचे फायदे स्पष्ट करताना शाळेला रुपये 1000 भेट देऊन आनंद व्यक्त केला.

अहमद कौचाली सरांनी सद्या 5- जी चा युग असला तरी गुरुजींचे महत्त्व निरंतर कायम राहील ते सोदाहरण सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक परकार सरांनी

प्रशालेने शिक्षण सप्ताह यशस्विरित्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे कौतुक करताना विद्यार्थिनींनी मान्यवरांकडून मिळालेल्या कानमंत्रांचा वापर करून जीवन यशस्वी करावे असे आवाहन केले.

यावेळी अब्दुल गफूर महाडीक, सईदा चौगले व शेहनाज खोत आवर्जून उपस्थित होते. आभारप्रदर्शन व स्नेह भोजनाने सभेची सांगता करण्यात आली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *