Breaking News
मोठी बातमी – TWJ घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला गुजरातमधून अटक, ठाणे पोलिसांची कोकण कट्टा न्यूजला माहिती गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी लावून धरली होती बातमी, गुतवणूकदारांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार BIG NEWS सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दापोली : शहरात उनाड गुरांचा हैदोस, व्यापारी आणि ग्राहक हैराण दापोली : हॉटेल कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, परिसरात हळहळ चिपळूण : अवैध पशुवाहतुकीवर पोलिसांची कारवाई, 14 लाखांच्या मुद्देमालासह 7 म्हशी, एका गाईची सुटका

चिपळूण : गांजा विक्री प्रकरणात बॉडीबिल्डर अमर लटकेला अटक

banner 468x60

चिपळूणात गांजा प्रकरणी पोलिसांची धरपकड सुरू आहे. आतापर्यंत चिपळूण पोलिसांनी सात जणांना अटक केली असून गांजा विक्रेता बॉडीबिल्डर अमर चंद्रकांत लटके याला पुन्हा एकदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

चिपळूणात चार तरूण गांजा ओढताना विरेश्वर कलनी नजिक सापडले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. या तरूणांनी आपण गांजा अमर लटके यांच्याकडून आणल्याचे सांगितल्यानंतर जिम व्यावसायीक बॉडीबिल्डर अमर लटके याला अटक झाली. यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली व त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

banner 728x90

मात्र याच दरम्यान धरपकड सुरू असताना विजय शांताराम राणे (५६, मुरादपूर भोईवाडी), ओंकार सुभाष कराडकर (२६, टेरव कुंभारवाडी) यांना गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक केली.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अमर लटके याच्याकडून आठ दिवसांपुर्वी गांजा खरेदी केल्याचे सांगितले. यानंतर जामिनावर सुटलेला अमर लटके याला पुन्हा सोमवारी सायंकाळी ४ वाजता ताब्यात घेऊन अटक केली आहे. याशिवाय रविवारी रात्री शहरात गस्त सुरू असताना अमीर उमर शेख (२३, मुरादपूर मिठागरी मोहल्ला) याला गांजाा सेवन प्रकरणी अटक केली आहे.

अटक केलेल्यांकडून प्रत्येकवेळी आपण गांजा अमर लटके याच्याकडून खरेदी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लटके गांजा कोठून आणतो, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याप्रकरणी पोलिसांनी गांज्याचे रॅकेट उद्धस्थ करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चिपळूणात झालेल्या नागरिकांच्या बैठकीत देखील हाच मुद्दा उपस्थित झाला. गांजा ओढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतानाच पोलिसांनी गांजा पुरवठादार आणि त्यामागे असलेले रॅकेट उघड करून त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *