वडिलांच्या मृत्यूपश्चात जमिनीच्या मिळकतीवर वारस म्हणून नाेंद करण्यासाठी ५०० रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवतर (ता. खेड) येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
अमाेल महावीर पाटील (३१, सध्या रा. खेड, मूळ रा. इंग्राेळे काॅर्नर हुपरी, ता. हातकणंगले, काेल्हापूर) असे तलाठ्याचे नाव आहे. ताे सजा शिवतर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांचा २०१४ साली मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे जमीन मिळकतीचा वारस तपास हाेऊन तक्रारदाराचे नावे करण्यासाठी अर्ज केला हाेता. त्यासाठी अमाेल पाटील याने १७ फेब्रुवारी २०२३ राेजी १००० रुपयांची मागणी केली हाेती. याबाबत पडताळणी केल्यानंतर ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी लाचलुचपत विभागाने त्याच्यावर खेड पाेलिस स्थानकात २८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.
तलाठी अमोल पाटील याने तक्रारदार यांच्याकडे १ हजारांची लाच रक्कमेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी यांना दिली होती. त्या अनुषंगाने दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी या तक्रारीची पडताळणी केली होती. त्यानंतर ५०० रुपयांची लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, सापळा रचून लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*