चिपळुण : नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवकपदासाठी 110 उमेदवार रिंगणात

banner 468x60

चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर २८ जागांच्या नगरसेवकपदासाठी तब्बल ११० उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता चिपळूण नगर परिषदेची निवडणूक बहुरंगी होणार आहे.

banner 728x90

तर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली असून, शिंदे सेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुधीर शिंदे नाट्यमयरीत्या काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. चिपळूण नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिंदे शिवसेना, ठाकरे सेना, भाजपा आणि समाजवादी पार्टी अशा सात पक्षांमध्येख तर दोन अपक्षांमध्ये होणार आहे.

यामध्ये नगरसेवक पदासाठी १९ उमेदवार अपक्ष निवडणूक लढणार आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी युतीकडून उमेश सकपाळ, ठाकरे शिवसेनेकडून राजेश देवळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून रमेश कदम, काँग्रेसमधून सुधीर शिंदे, समाजवादी पार्टीचे मोइन पेचकर तर अपक्ष निशीकांत भोजने व लियाकत शहा असे ७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये याआधीच नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मिलींद कापडी यांनी माघार घेतली.

तर नगरसेवकपदासाठी प्रभाग १ अ मधील इशरद गोठे, १ व मधील श्रीराम शिंदे, रिजवान सुर्वे, नईम खाटीक, प्रभाग ५ अ मधील सुनिल खेडेकर, ५ ब मधील सिमा रानडे, भक्ती कुबडे, ८ अ मधील मृणाल घटे, ११ ब मधील महेंद्र सावंत अशा ९ जणांनी शुक्रवारी शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *