रत्नागिरी : अतिवृष्टीत बेघरांना ‘नाम’ वंत मॉडेल

banner 468x60

नैसर्गिक आपत्ती आली की सर्वात मोठा प्रश्न हा पुनर्वसनाचा असतो. जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यात 2021 मध्ये झालेल्या आपत्तीमध्ये अनेक लोक बेघर झाले. गेल्या वर्षी सुदैवाने मोठा पाऊस झाला नाही, तरीही पावसाळ्यापूर्वी संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक भाग दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केला आणि त्या भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला होता. मात्र स्थानिक ग्रामस्थ पुनर्वसनासाठी सहसा तयार होत नाहीत, झालेच तर त्यांचे पुनर्वसन कसे करायचे कुठे असाही प्रश्न निर्माण होतो. त्यात अनेकदा पुनर्वसन रखडते. नैसर्गिक आपत्ती आली की सर्वात मोठा प्रश्न हा पुनर्वसनाचा असतो. 2021 मध्ये झालेल्या वादळी-वाऱ्याच्या अतिवृष्टीत सह्याद्रीच्या कडेवर राहणाऱ्या धनगरवाडीतील अनेक घरं जमीनदोस्त झाली. अशा परिस्थितीत तेथील रहिवाशांच्या समोर एकच प्रश्न उभा राहिला तो म्हणजे आपल्या डोक्यावरचे छत नव्याने उभे कसे करायचे? अशा वेळी ‘नाम’ फाऊंडेशनने पुढाकार घेतला आणि त्यांना घरे बांधून दिली. आकले गावातील डोंगराळ भागात वसलेल्या निंबारवाडीत खापरे कुटुंबातील चार पिढ्या तर ओवळीतील धामणा-धनगरवाडीत सात कुटुंब राहत होते. दोन्ही वाडीत एकूण एकोणिस कुटुंब होती. 2021 मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत या दोन्ही वाड्यातील घरे जमीन दोस्त झाली सतत पडणाऱ्या पावसात आता राहायचं कुठं जगायचं कसं असा प्रश्न या रहिवाशांसमोर निर्माण झाला. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसात डोंगराच्या टेकडीवरून खाली येऊन गावात गावकऱ्यांचा आसरा घेतला. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आपलं छत उभं करायचं होतं, मात्र या पावसाने सर्व काही त्यांचा संसार आणि छत हिरावून घेतलं होतं. त्यांच्याकडे पुन्हा नव्याने छत उभं करण्यासाठी काही शिल्लक राहिले नव्हतं. तर पुन्हा उभं करायचं म्हटलं तर पुन्हा वादळ-वारा, अतिवृष्टी जीव डोक्यात घेऊन पुन्हा

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *