दापोली तालुक्यातील हर्णै बाजारपेठेत पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात 8 ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात जितेंद्र तबीब आणि नारायण पावसे यांना गंभीर दुखापत झाली असून इतर जखमींवर वेळेत उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याने संबंधित बैलाच्या डाव्या मांडीवर आणि तोंडावर चावे घेतले होते. त्यानंतर हा बैल पिसाळल्याने त्याने हर्णै बाजारपेठ आणि बंदर परिसरात धुमाकूळ घालत ग्रामस्थांवर हल्ला केला. हा बैल जोरात धावत नागरिकांना मारण्याचा प्रयत्न करत होता.
दरम्यान, प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी मोठ्या दोरखंडाच्या साहाय्याने या बैलाला शिताफीने पकडून बांधले. त्यानंतर दापोली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार केल्याने बैल शांत झाला आहे.
सध्या बैलावर उपचार सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













