चिपळूण : एसटी बसमध्ये चढताना महिलेच्या सॅकमधून ५ लाखांची रोकड लंपास

banner 468x60

एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या काळ्या रंगाच्या सॅकची चैन उघडून त्यातील तब्बल ५ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास चिपळूण आगारात घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत प्रज्ञा प्रशांत हरेकर (वय ३८, रा. मुंडेतर्फे सावर्डे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञा हरेकर या चिपळूण आगारातून सुटणाऱ्या चिपळूण–वीरबंदर एसटी बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या काळ्या रंगाच्या सॅकची चैन उघडली आणि त्यातील ५०० रुपयांच्या प्रत्येकी १०० नोटांचे १० बंडल, अशी एकूण ५ लाख रुपयांची रोकड चोरून नेली.


थोड्या वेळाने हा प्रकार लक्षात येताच हरेकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *