दापोली : येथील 41 वर्षीय ममजीद शेख बेपत्ता; दापोली पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

banner 468x60

दापोली तालुक्यातील वाकवली नवानगर येथील रहिवासी ममजीद जैनुद्दीन शेख (वय ४१) हे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांच्या शोधासाठी दापोली पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टर क्रमांक १२/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममजीद शेख हे दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वाकवली नवानगर येथील आपल्या घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडले. त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांच्या नातेवाईकांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ममजीद शेख यांची उंची सुमारे ५.४ फूट असून रंग सावळा, बांधा मध्यम आहे. बेपत्ता होताना त्यांच्या अंगात निळ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि पायात चप्पल होती. त्यांच्या सोबत कापडी पिशवीही होती. त्यांच्या डोक्याच्या पुढील भागात टक्कल असून मागील बाजूस बारीक केस आहेत. तसेच काळी-पांढरी वाढलेली दाढी हे त्यांचे विशेष ओळखचिन्ह आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ममजीद शेख हे मानसिक अस्थिर अवस्थेत घराबाहेर पडल्याची शक्यता असून, त्यांनी कोणालाही न सांगता अचानक निघून गेल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.


दापोली पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून, परिसरातील पोलीस ठाण्यांना तसेच संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. बेपत्ता व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ दापोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हवालदार आर. ए. पवार आणि ए. एस. गायकवाड यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक:
दापोली पोलीस ठाणे – ९५५२२६७००५ / ७८८७८३९७२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *