मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावदरम्यान वन-वे स्पेशल ट्रेन दि. 9 जून रोजी धावणार आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
यासंदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01149 मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन वन-वे स्पेशल ट्रेन ही वन-वे स्पेशल गाडी शुक्रवार, दि. 9 जून 2023 रोजी मुंबई सीएसएमटी येथून पहाटे 5 वा. 30 मिनिटांनी सुटेल
आणि मडगाव जंक्शनला ती त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला एकूण 16 एलएचबी श्रेणीचे कोच असतील. त्यात व्हिस्टाडोम 01 कोच, एसी चेअर कार 03 कोच, सेकंड सीटिंगचे 10 कोच,
एसएलआर – 01 तर जनरेटर कार 01 असे डबे या गाडीला असतील. वन वे स्पेशल गाडीचे थांबे ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी स्थानकावर थांबणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













