विधानसभा निवडणुकीपूर्वी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ८२४ लाभार्थी बहिणींच्या खात्यावर आचारसंहितेपूर्वीच जमा झाले होते.
मात्र काही त्रुटींमुळे जिल्ह्यातील २ हजार ६५३ बहिणींच्या खात्यात योजनेच्या आर्थिक लाभाचा एकही हप्ता जमा झालेला नाही. त्यांना योजनेचा लाभ कधी मिळणार याकडे त्या बहिणींच्या नजरा लागल्या आहेत. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्यानेमहायुतीला मोठं यश मिळाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा या यशाचे श्रेय लाडक्या बहिणींना दिलं आहे. त्याचप्रमाणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रुपये मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने आता सर्वच बहिणींची उत्सुकता ताणली गेली आहे.
राज्यात जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात पोर्टलसह थेट अर्जदेखील मिळून ४ लाख २३ हजार महिलांनी अर्ज केले.
त्यांची छाननी होऊन जिल्ह्यातील ४ लाख १८ लाभ ८२४ महिलांचे अर्ज मंजूर झाले. त्यांच्या खात्यात महिन्याला १५०० ते ३ हजार जमा होण्यास सुरुवात झाली. तर काही त्रुटींमुळे २ हजार ६५३ अर्ज प्रलंबित आहेत

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*