रत्नसागर जल, कृषी आणि ग्रामीण फाउंडेशन-सुखदर, तालुका-दापोली या संस्थेच्या वतीने सहकार आणि कोकणातील शाश्वत पर्यटन या विषयावर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, या मुलाखतीमध्ये दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
या मुलाखती दरम्यान कोकणातील सहकार चळवळ आणि कोकणातील शाश्वत विकास या विषयावर आपले शाश्वत विचार मांडत कोकणचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने कसा साधता येईल याबद्दल जयवंत जालगावकर यांनी आपले मत व्यक्त केले, तसेच पर्यटन, कृषी, भौतिक सुविधा, पर्यावरण आणि कोकणातील ग्रामीण संस्कृती ही शाश्वतपणे जपणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
रत्नसागर, जल, कृषी आणि ग्रामीण फाउंडेशन या संस्थेचे गौरवोद्गार काढत असताना त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन संस्थेबद्दल संस्थेचे कौतुक केले .
या संस्थेच्या संस्थापिका सौजन्या क्षीरसागर व सचिव संजय क्षीरसागर या उभयंताचे मनापासून कौतुक केले , या संस्थेच्या माध्यमातून अनेक विकासकामे ग्रामीण भागामध्ये होताना दिसत आहेत या संस्थेद्वारे सुखदर येथे अतिशय भव्य असे ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे, तसेच औषधी वनस्पतींचे मोफत वाटप देखील बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी केले आहे ,
अशा विविध उपक्रमांद्वारे विकास साधण्यासाठी ही संस्था कटिबद्ध असल्याचे मत संस्थेचे सचीव संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
ही मुलाखत रामराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक कुणाल मंडलिक यांनी घेतली, या मुलाखती दरम्यान दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बिपिन पाटणे, माजी जिल्हा परिषद सदस्या चारुलता कामतेकर , नगरसेविका साधना बोत्रे, पत्रकार, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*