चिपळूण : दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकामुळे तिहेरी अपघात

banner 468x60

चिपळूण : अंमली पदार्थांचे सेवन करून बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे चिपळूणमध्ये प्रांत कार्यालयासमोर सिध्दकला अपार्टमेंटजवळ १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तिहेरी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.

banner 728x90

या अपघातात तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.याप्रकरणी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलेश महादेव मिठाग्री (वय ४२, रा. जोसरांजन, पो. शित्रे, ता. मुरुड जंजिरा, जि. रायगड) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. रोहित बाचासाहेब मोरे (वय ३२, रा. बहुज, ता. खटाव, जि. सातारा)

या इनोव्हा कार चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, ३२४(४) (५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

फिर्यादी कमलेश मिठाग्री हे आपली ह्युंडाई क्रेटा कार (एम.एच.-०१/डी.बी.-९९००) घेऊन गोवा ते मुंबई प्रवास करत होते.

चिपळूण येथे प्रांत कार्यालयासमोर सिध्दकला अपार्टमेंट जवळील स्पीड ब्रेकरजवळ ते आले असता, मागून भरधाव वेगाने येणारी इनोव्हा कार (एम.एच.-४७/ए-८१७७) हिचे चालक रोहित मोरे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, अत्यंत हलगर्जीपणाने व बेदरकारपणे वाहन चालवले.

आरोपी रोहित मोरे याने कोणत्यातरी अंमली पदार्थाचे सेवन केले होते आणि त्याच नशेत त्याने वेगाने येऊन फिर्यादींच्या क्रेटा कारला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे अपघात झाला आणि यात क्रेटा कार, आणखी एक ‘वॅगन-आर’ कार आणि आरोपीच्या ताब्यातील इनोव्हा कार अशा तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

आरोपीने बेदरकारपणे आणि अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चिपळूण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *