मंडणगड : हत्या करून सोनसाखळी लुटणाऱ्या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

banner 468x60

मंडणगडमध्ये २०१७ साली तालुक्यात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना खेड येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश. पी. एस. चांदगुडे यांनी हा निकाल गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी जाहीर केला.

banner 728x90

सदर गुन्हा मंडणगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७/२०१७, सेशन केस नं. ०४/२०१८ या क्रमांकाने नोंदवण्यात आला होता. आरोपी १) अभिजीत सुधाकर जाधव (वय २७, रा. गव्हे, ता. दापोली), २) नरेंद्र संतोष साळवी (वय २८), आणि ३) अक्षय विष्णू शिगवण (वय २८, रा. बोंडीवली, ता. दापोली) या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवून भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३९२, ३९७, १२० (ब) आणि २०१ अन्वये शिक्षा सुनावली.

आरोपींना कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड, कलम ३९२ आणि ३९७ अंतर्गत प्रत्येकी ७ वर्षांची सश्रम कैद व दंड, तसेच कलम १२० (ब) आणि २०१ अंतर्गत पुन्हा जन्मठेप व प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास प्रत्येक कलमासाठी तीन महिने साधी कैद ठोठावली आहे. तसेच आरोपींकडून मिळालेल्या दंडाच्या एकूण रकमेपैकी २०,००० रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

न्यायालयाने दिला.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी राजाराम बाळकृष्ण चव्हाण यांचा खून करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि दोन मोबाईल फोन आरोपींनी लुटून नेले. पैशाच्या हव्यासापोटी या तिघांनी संगनमताने योजना आखली होती. त्यांनी साक्षीदार बाबाजी रामा निर्मल यांच्या हरविलेल्या मोबाईलमधील सिमकार्ड वापरून एकमेकांना संदेश पाठवून खूनाचा कट रचला. आरोपींनी मयत चव्हाण यांना टाटा मॅजिक (एमएच ०८ झेड ९३८९) गाडीद्वारे प्रवासाचे खोटे आमिष दाखवून बोलावले आणि त्यानंतर तिक्ष्ण हत्यार व दगडांनी त्यांची हत्या करून मृतदेह पुलाखालील सिमेंट पाईपमध्ये फेकून दिला होता. या प्रकरणात सरकार पक्षाकडून एकूण ३२ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. मोबाईल लोकेशन, सीडीआर, एसडीआर, न्यायवैज्ञानिक अहवाल, घटनास्थळी सापडलेले पुरावे, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि साक्षीदारांच्या साक्षांवरून आरोपी दोषी असल्याचे न्यायालयाने नमूद केले. सरकार पक्षातर्फे वकील..

मृणाल जाडकर यांनी युक्तिवाद करत आरोपींच्या गुन्ह्याचे सखोल विवेचन केले. प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक. अनिल गंभीर यांनी पार पाडली, तर कोर्ट कार्यवाहीसाठी पोलीस उपनिरीक्षक. हरिश्चंद्र पवार आणि महिला पोलीस हवालदार वैशाली सुकाळे यांनी सहकार्य केले. या निकालामुळे मंडणगड तालुक्यातील या खळबळजनक खुनाच्या प्रकरणाला अखेर न्याय मिळाला असून स्थानिक पोलिस दल व सरकारी वकिलांच्या समन्वयाने न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *