Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

लांजा : कुर्णे येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

banner 468x60

लांजा तालुक्यातील कुर्णे गावात एका व्यक्तीचा घरातच सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृताच्या अंगावर जखमेच्या खुणा आणि वार आढळल्याने हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

banner 728x90 banner 728x90


सुरेश रामचंद्र पड्ये (वय ४५, रा. कुर्णे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एकटेच घरी राहत होते. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सुरेश यांच्या मुलीने वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने सोमवारी रात्री चुलत काका शाम पड्ये यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले.
यानुसार, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शाम पड्ये सुरेश यांच्या घरी गेले असता घरातच त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांना व तत्काळ लांजा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. अंधारामुळे मंगळवारी सकाळी श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.


अप्पर पोलिस अधीक्षक जयंत महामुन्नी, उपअधीक्षक राधिका फडके, निरीक्षक अमित यादव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस पथकाने पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक पाहणीत सुरेश पड्ये यांच्या डाव्या हातासह अंगावर जखमेच्या खुणा आणि वार आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवर वार केले की कोणी अज्ञात व्यक्तीने त्यांचा घातपात केला,

याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. १५ जानेवारी दुपारी तीननंतर ते घरात एकटेच असल्याने नेमका प्रकार कधी घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असून या प्रकरणाचा सखोल तपास लांजा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *