ए. के. आय. सेमी इंग्लिश हायस्कूल, दाभोळ येथे नुकतेच विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित नाविन्यपूर्ण व उपयुक्त प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात वाइज खान यांच्या कुरआन पठणाने झाली. विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून दापोली येथील ए. जी. माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मा. खटाव तसेच लोकमान्य टिळक हायस्कूल, दाभोळ येथील शिक्षिका सौ. रोशनी गावडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे बारकाईने मूल्यमापन केले.


कनिष्ठ गटाचे निकाल :
प्रथम क्रमांक – कुमार अरफत दर्वेश
द्वितीय क्रमांक – कुमारी जोया शेख व फातिमा बामणे (संयुक्त)
तृतीय क्रमांक – कुमार जिदान बामणे
वरिष्ठ गटाचे निकाल :
प्रथम क्रमांक – आशियाना शेख व खातिजा मुगाये
द्वितीय क्रमांक – तैमिना दर्वेश, कुमारी जोहा फडणीस व कुमारी सारा मुजावर (संयुक्त)
तृतीय क्रमांक – अनस बामणे व अर्कम मत्रोजी
या विज्ञान प्रदर्शनास पत्रकार स्वप्निल घटे, शालेय प्रगत समितीचे सदस्य व माजी विद्यार्थी वाहिद निलिक्कर, आयेशा निलिक्कर, पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा रेश्मा मुकादम, उपाध्यक्ष ममतुले, तसेच मोहम्मद बामणे व तजम्मुल पापा उपस्थित होते.
याशिवाय परिसरातील विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
हे विज्ञान प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक फजलुद्दीन बामणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना चषक व पदके देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती व सर्जनशीलता विकसित करण्याच्या दृष्टीने हे विज्ञान प्रदर्शन निश्चितच प्रेरणादायी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलोफर शेख यांनी केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













