Breaking News
रत्नागिरी : मुन्ना देसाईंसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप

शृंगारतळी : परिसरात परप्रांतीय अण्णा लोकांकडून सावकारी धंद्याचा सुळसुळाट

banner 468x60

सावकारांकडून होणारी पिळवणूक ही काही नवीन बाब नाही. आजही अनेक लोक खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. या कर्जाचा व्याजदर जास्त असतो. हाच प्रकार शृंगारतळी पाहायला मिळत आहे.

banner 728x90 banner 728x90

शृंगारतळी परिसरात परप्रांतीय अण्णा लोकांकडून सावकारी धंद्याचा सुळसुळाट सुरू आहे.
शृंगारतळी ही गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी समजली जाते आणि अनेक स्थानिक व परजिल्ह्यातील तसेच राज्यातून नोकरी व्यवसायासाठी लोक येत असतात.

अशाच छोट्या व्यवसायिकांना चिपळूण तालुक्यातून येणारे काही अण्णा लोक कर्जाचे आमिष दाखवून पाच दहा हजार रुपयांचे कर्ज देतात व नंतर वसुलीसाठी मनस्ताप दिला जातो. वीस टक्क्या पर्यंत व्याजदराने ही रक्कम दिली जाते आणि वसुली झाली नाही तर दुकाना बाहेर बसून राहणे गिऱ्हाईक असेल त्यावेळी शिवीगाळ करणे असे प्रकार वाढत असून त्यातून बाजारात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अश्या अण्णा लोकांवर स्थानिक पोलिसांनी लक्ष ठेवावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तळीत सावकारी प्रवृत्ती आता डोके वर काढू लागली आहे.

दिलेल्या भक्कम अशा तारणामुळे घरची मंडळीही हैराण आहेत. परंतु या सावकारा विरोधात कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने त्यांना चांगलेच फावत आहे.
संध्याकाळच्यावेळी दोन अण्णा बाईक वरून सावज हेरत बाजारात फिरत असतात असं तळीवरील नागरिकांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *