शृंगारतळी : अब्दुल वाहिद घारे बनले वकील, शिक्षकी पेशा सांभाळत मिळवले यश

banner 468x60

शृंगारतळी शहरातील शृंगारी मोहल्ला येथील अब्दुल वाहिद घारे यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई येथे नोंदणी करून वकील पदवी प्राप्त केली आहे. यांनी लॉ शिक्षणासोबत पनवेल येथे एका शिक्षण संस्थेवर शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत, स्वतःच्या मेहनतीने, चिकाटीने आणि अभ्यासू वृत्तीने हे यश मिळवले आहे.

banner 728x90

युवकांनी ध्येयपूर्तीसाठी जिद्दीने वाटचाल केल्यास यश सहज शक्य आहे, हे त्यांनी आपल्या स्वअनुभवातून दाखवून दिले आहे.


त्यांच्या या यशाचे विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून कौतुक होत असून, ते लवकरच न्यायालयीन कामकाज सुरू करणार आहेत. ग्रामीण भागातून येऊनही त्यांनी प्राप्त केलेली ही वकील पदवी अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावी आले असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.


यावेळी उपसरपंच आसिम साल्हे, ग्रा.पं.सदस्या आस्मा साल्हे हाश्मी मोहल्ला चे अली वणू, शोएब घारे,झुबेर घारे, सलीम घारे, रझ्झाक घारे, सर्फराज घारे, नदीम घारे, इस्तीयाक कारभारी, मौलाना काशीम हमदारे,अहमद घारे, मुश्ताक बरमारे, अब्दुरहमान साल्हे, व मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *