खेड:भडगाव – खोंडे गांवच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभु

banner 468x60

खेड शहराजवळील भडगाव – खोंडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीत सन २००७ पासून गेली १८ वर्षे ‘ पत्रकार सदस्य ‘ म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार

दिवाकर पुरुषोत्तम प्रभु यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या ग्रामसभेत करण्यात आली आहे.

तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि भडगांव – खोंडे गावचे रहिवाशी दिवाकर प्रभु यांनी आपल्या गावच्या तंटामुक्त समितीत काम करीत असताना त्यांनी एक वर्ष तालुक्यातील कुडोशी गावच्या तंटामुक्त समितीतही ‘ पत्रकार सदस्य ‘ म्हणून काम केलेले आहे.

खेड तालुका पत्रकार संघाचे सलग दोन वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषविले असून ते या संघात आजही कार्यरत आहेत. ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत खेडचे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहत आहेत. गेली ४० वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून त्यांच्या निःस्वार्थी कामाची दखल घेऊन

सन २०१३ साली मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना ‘ पत्ररत्न ‘ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अशा या सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभु यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भडगांव-खोंडे ग्रामपंचायत, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरज जोगळे आणि त्यांचे सहकारी, मावळते अध्यक्ष नारायण म्हस्के आणि सर्व माजी अध्यक्ष आणि भडगांव शेवरवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

या निवडीवेळी सरपंच दीपक पदुमले, उपसरपंच महेंद्र सावंत, ग्रा. पं. सदस्या सुवर्णा उसरे , वैभवी उसरे , तसेच विजय दवंडे, सुरज जोगळे , परशुराम दवंडे , अनंत लाले, प्रमोद बैकर , अनिल नक्षे ,कमलेश कुरमुरे , राजू कुरमुरे , संदीप घरवी , मंगेश पवार, सागर मोगरे, गंगाराम उसरे , विलास भोसले , विशाल बरजे , विजय उसरे , ग्रामसेविका मिनाक्षी सावंत – वाजे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू – भगिनी उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *